गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

एअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल

एअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 289 रुपये आहे. एअरटेलच्या या प्लॅनची स्पर्धा व्होडाफोनच्या अलीकडे लॉन्च झालेल्या 279
रुपयांच्या योजनेशी आहे. ही योजना दिल्ली-मुंबईसारख्या मेट्रो शहरांसाठी नाही . तर चला आता एअरटेलच्या या योजनेबद्दल जाणून घ्या:
 
* एअरटेलच्या 289 रुपयांच्या योजनेचे फायदे - 
एअरटेलच्या 289 रुपयांच्या योजनेत असीमित कॉलिंगसह दररोज 1 जीबी 2 जी / 3 जी / 4 जी डेटा मिळेल. या योजनेत दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. या योजनेची वैधता 48 दिवस आहे. त्याचवेळी, व्होडाफोनच्या 279 रुपयांच्या योजनेत 84 दिवसांची वैधता आहे. या योजनेतंर्गत आपण रोमिंगमध्ये विनामूल्य इनकमिंगसह असीमित आउटगोइंग कॉल करू शकाल. 
 
महत्त्वाचे म्हणजे एअरटेलने नुकत्याच 76 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे, हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी असून या योजने अंतर्गत ग्राहकांना 28 दिवस वैधतेसह 26 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळेल. या योजनेत 100 एमबी डेटा देखील मिळेल. या व्यतिरिक्त, 60 पैशांच्या दराने लोकल आणि एसटीडी कॉल करणे शक्य होईल. या योजनेबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की ही योजना 2 जी / 3 जी / 4 जी सर्व ग्राहकांसाठी आहे.