अ‍ॅपल वर्षातून दोनदा iPhone लाँच करणार

apple iphone se
Last Modified शनिवार, 14 डिसेंबर 2019 (14:39 IST)
स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळं अ‍ॅपलनं स्मार्टफोन लाँचिंगच्या धोरणात बदल करण्याचा विचार केला आहे. रिपोर्टनुसार, 2021 पासून अ‍ॅपल कंपनी वर्षातून दोन वेळा आयफोन लाँच करणार आहे. बदलत्या धोरणामुळं दरवर्षी दोन लाँचिंग सोहळे आयोजित करणे कंपनीसाठी सोपे ठरेल. प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यात कंपनी यशस्वी ठरेल, असं मानलं जात आहे.
मोबाइल हार्डवेअरच्या माध्यमातून कमाई- वर्षात दोन वेळा आयफोन लाँच केल्यानं अ‍ॅपलला महसुलाच्या बाबतीत हुवावे, सॅमसंग आदी कंपन्यांच्या आसपास पोहचण्यास मदत होईल. लाँचिंग धोरणाच्या बाबतीत म्हणाल तर, अ‍ॅपल या कंपन्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. वर्षात केवळ एकच नव्या सीरिजमधील फोन लाँच करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. अ‍ॅपल हे बजेटमधील स्मार्टफोन विक्री करत नाही. अशा वेळी मोबाइल हार्डवेअर हाच कंपनीच्या महसुलाचा मुख्य स्त्रोत आहे.
नव्या स्मार्टफोनमध्ये 5 जी- जे. पी. मॉर्गनचे प्रॉडक्ट अ‍ॅनालिस्ट्‌सनं यासंदर्भात सीएनबीसीला माहिती दिली. 2021 या वर्षात अ‍ॅपल चार नवीन आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हे सर्व फोन ओएलईडी आणि फाइव्ह जी नेटवर्क सपोर्टसह बाजारात येतील. यातील काही फोनमध्ये mmWave टेक्नॉलॉजी सपोर्ट करणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली.

खास तंत्रज्ञान- 2021मध्ये अ‍ॅपल एक 5.4 इंच, दोन 6.1 इंच आणि एक 6.7 इंच डिस्प्लेचे आयफोन लाँच करणची शक्ता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नव्या आयफोनच्या प्रीमिअम व्हेरियंटमध्ये mmWave फाइव्ह सपोर्टसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि खास वर्ल्ड फेसिंग थ्रीडी सेन्सिंग असेल. अन्य फोनमध्ये ड्यूएल रिअर कॅमेरा असेल.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून ...

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि ...

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे कराल एक्टिवेट
प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook)ने आपल्या लाइट व्हर्जन (Facebook Lite)च्या ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह ...

काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये में महादेवासाठी रिर्झव्ह सीटमुळे वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीहून 'काशी-महाकाल एक्स्प्रेस' रवाना केली. यात ...