शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा

आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास फोन पावसात ओला झाला किंवा त्यावर पाणी पडलं तर हे सोपे उपाय करून बघा-
 
सर्वात आधी करा स्विच ऑफ 
पाण्यात ओला झाल्यावर सर्वात आधी मोबाइल लगेच स्विच ऑफ करून द्यावा. ऑफ होऊन गेला असेल तर ऑन करण्याची चूक मुळीच करू नका. पाण्याचा एक थेंब आतापर्यंत पोहचला असेल तर चिपमध्ये लागलेल्या सर्किंट्सला आपसात जोडून त्याला खराब करू शकतो. आपल्या फोनमध्ये स्पार्किंग देखील होऊ शकतं. फोनमध्ये लावलेली ऍक्सेसरीज लगेच हटवून द्या.
 
लगेच बॅटरी काढा
पाण्यात फोन पडल्यावर लगेच बॅटरी काढा. बॅटरी काढल्यावर हँडसेटमध्ये बॅटरीखाली लहान स्टिकर चिकटलेलं असतं, अनेक फोनमध्ये स्टिकरचा रंग पांढरा असतो. फोनच्या आत पाणी गेल्यास स्टिकर गुलाबी किंवा लाल रंगात बदलून जातं. या स्टिकरचा रंग परिवर्तित असल्यास फोनमध्ये मॉइस्चर आहे समजून घ्या.
 
फोन वाळवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा मायक्रोवेव्ह वापरू नये 
फोन वाळवण्यासाठी कधीही मायक्रोवेव्ह किंवा हेअर ड्रायर वापरू नका. याने फोनला हानी होऊ शकते. फोन पंख्याखाली ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. फोन वाळवण्यासाठी थेट सूर्य प्रकाशात ठेवू नका.
 
मॉइस्चरायझर हटवा 
हार्डवेअर किंवा केमिस्टच्या दुकानातून वॉटर ब्लॉटिंग पेपर खरेदी करा. यात वाळवलेल्या फोनला सिलिका पॅकमध्ये किमान दोन दिवसासाठी ठेवून द्या. 
 
तांदूळ
एका कंटेनरमध्ये तांदूळ भरून आपल्या फोन एक दिवसासाठी यात ठेवून द्या. 
 
पूर्ण ड्राय झाल्यावरच करा रीस्टार्ट 
फोन पूर्ण वाळल्यावरच त्यात बॅटरी व सिम टाकून स्टार्ट करा. स्क्रीनवर लाइन येत असल्यास किंवा बटण क्लिक होत नसल्यास किंवा फोन ऑन होत नसल्यास दुरुस्तीसाठी टाकावा लागेल.