testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता स्मार्टफोनमध्येच इनबिल्ट प्रोजेक्टर!

smart phone
Last Modified बुधवार, 17 जानेवारी 2018 (13:20 IST)
स्मार्टफोनमध्ये प्रोजेक्टर असल्यास किती मजा येईल असा विचार आपण करत असाल, तर आता मोव्हीफोन या मॉडेलमध्ये याच प्रकारचे इनबिल्ट प्रोजेक्टर देण्यात आले आहे. मोव्ही कंपनीने दोन वर्षांपूर्वीच स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट प्रोजेक्टर देण्याचे घोषित केले होते. या मॉडेलची तेव्हा प्राथमिक माहितीदेखील देण्यात आली होती. तथापि, आता हा प्रोजेक्टरयुक्त स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार असून याचे लास व्हेगास शहरात सुरू असलेल्या सीईएस-2018 या प्रदर्शनात अनावरण करण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या वरील बाजूस पिको कंपनीचे प्रोजेक्टर देण्यात आले आहे. याच्या मदतीने एचडी म्हणजेच 720 पिक्सल्स क्षमतेच्या प्रतिमा आणि चलचित्र प्रक्षेपित करून 200 इंच आकारमानाच्या स्क्रीनवर पाहता येतात. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोन कसाही फिरवला तरी पडद्यावर
उमटणार्‍या प्रतिमा वा व्हिडिओ या आपोआप अ‍ॅडजस्ट होतात. खरं तर अलीकडच्या काळात अत्यंत आटोपशीर आकाराचे प्रोजेक्टर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एखाद्या स्मार्टफोनमध्येच अशा प्रकारची सुविधा असल्यास पोर्टेबल प्रोजेक्टरची गरजदेखील उरणार नाही. तत्काळ एखादे प्रेझेंटेशन दाखविण्यासह शैक्षणिक वा मनोरंजन बाबींसाठी याचा वापर होऊ शकतो. यामुळे अर्थातच हे मोव्हीफोनमधील सर्वात लक्षणीय फीचर मानले जात आहे. उर्वरित फीचर्सचा विचार केला असता यात 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेक एटी6750 प्रोसेसर असून 3 जीबी रॅम /32 जीबी स्टोअरेज आणि 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय असतील. हे स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढविता येईल. या स्मार्टफोनमध्ये 13 व 8 मेगापिक्सल्सचे मुख्य व फ्रंट कॅमेरे आहेत. तर यातील 4,000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत प्रोजेक्टर चालवता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात फुल
बॅटरी असल्यास एखादा चित्रपट पाहणे सहजशक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. याचे मूल्य 599 डॉलर्स (सुारे 38 हजार रूपये) इतके असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मोव्ही कंपनीने दिली आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे

national news
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...

सुभाषचंद्र बोस आणि कारावास

national news
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...