गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (11:44 IST)

Xiaomi Redmi 7 सिरींजबद्दल माहिती

Redmi 6 सिरींजनंतर आता असे वाटत आहे की चीनची मोबाइल निर्माता कंपनी Xiaomi आपल्या Redmi 7
सीरीझच्या 3 नवीन स्मार्टफोनवर कार्यरत आहे. तथापि, शाओमीने सध्या या माहितीची पुष्टी नाही केली आहे, पण शाओमीच्या आगामी स्मार्टफोनला चीन अनिवार्य प्रमाणपत्र (3सी) कडून प्रमाणपत्र मिळाले आहे. कंपनी Redmi 7 सीरीझच्या अंतर्गत Redmi 7A, Redmi 7 आणि Redmi 7 Pro हे 3 स्मार्टफोन काढू शकते. 3 सी यादी दर्शविते की नवीन शाओमी स्मार्टफोन 5V/2A चार्जिंग (10 वॅट) स्पोर्टसह येतील. यादीत तीन मॉडेल नंबर M1901F7E, M1901F7T आणि M1901F7C दृश्यमान आहे. हे तीन मॉडेल Redmi 7 सिरींजचे Redmi 7A,
Redmi 7 आणि Redmi 7 Pro असू शकतात. शाओमी हँडसेटला हा 3सी प्रमाणपत्र 29 नोव्हेंबरला मिळाला. तिन्ही मॉडेल 4 जी एलटीई सपोर्ट आणि 5V/2A चार्जिंग सपोर्टसह येतील. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे की या वर्षी लॉचं झालेले रेडमी मॉडेलच्या मॉडेल क्रमांक quot, M18 & quot,  होती आणि या नवीन मॉडेल क्रमांकाच्या सुरुवातीमध्ये &quot, M19 & quot  लिहिलेले दिसत आहे. त्याचा अर्थ म्हणजे Redmi 7 सीरीझ स्मार्टफोन पुढच्या वर्षी लॉचं केले जाऊ शकतात. शाओमीने Redmi Note 6 Pro चीनमध्ये सध्या लॉचं केला नाही आहे जो
सप्टेंबरमध्ये थायलंडमध्ये लॉचं करण्यात आला होता. Redmi 7 सीरीझच्या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही आहे. परंतु अशी आशा आहे की लवकरच या स्मार्टफोनशी संबंधित महत्त्वाची माहिती उघड केली जाऊ शकते.