गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2015 (11:50 IST)

पहिला किड्स स्मार्टफोन

स्वाइप टेक्नॉलॉजीने स्वाइप हा किड्स स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला असून भारतात आलेला हा पहिला किड्स स्मार्टफोन आहे. यात जिओ ट्रेकिंग, जिओ फेसिंग, एक्सपेंडेंबल पॅरंट कंट्रोल व यूनिक लर्निग एक्स्पिरियन्स अशी पॉवरफुल फिचर्स दिली गेली आहेत. या फोनची किंमत आहे 5999 रुपये. स्वाइप ज्युनिअर या नावाने हा स्मार्टफोन बाजारात आला आहे.

या स्मार्टफोनसाठी 4.5 इंची आयपीएस डिस्प्ले, 4 जीबी इंटरनल मेमरी, अँड्रॉइड किटकॅट 4.4 ओएस, सिंगल 3 जी सीम, 2 एमपीचा रियर व 0.3 एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. फोनसाठी वायफाय, ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हिटी आहे, तसेच प्री लोडेड पॅरेंटस फीचर दिले गेले आहे. यामुळे पालकांना आपल्या मुलांनी किती वेळासाठी इंटरनेट पाहिले, कोणत्या साईट पाहिल्या, कोणते गेम्स खेळले, याची माहिती मिळेल तसेच या फोनमध्ये असलेल्या जिओ ट्रेकिंगमुळे पालकांना मुलांची पोझिशन ट्रॅक करणे शक्य होणार आहे.

फोनला शॉक प्रूफ ड्यूरेबल डिझाइन दिले आहे. त्यामुळे रफ यूज केला तरी फोनचे नुकसान होणार नाही. या फोनला रियल टाइम क्लाऊड कनेक्ट दिले गेले आहे.