शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: रविवार, 17 जुलै 2016 (13:58 IST)

स्मार्टफोन वापरात पुरुषच अव्वल

परदेशातल्या दोन विद्यापीठांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये, स्त्रियांच्या तुलनेत पुरूष जास्त वेळ मोबाइलपासून लांब राहू शकत नसल्याचं दिसून आलंय. या अभ्यासामध्ये मोबाइल वापरासंदर्भातल्या अनेक नवीन गोष्टी समोर आल्या आहेत.
 
मोबाइल फोन जास्त कोण वापरतो यावरून त्या दोघांमध्ये नेहमीच वाद होतात. ती म्हणते, तू सतत मोबाइलला चिकटलेला असतो. तर त्याचं म्हणणं असतं हेच मीही म्हणू शकतो. असे दोघेजण घराघरात दिसून येतात. मग ते नवरा-बायको असो, आई-मुलगा असो किंवा प्रियकर-प्रेयसी असो. खरं तर सगळ्यांच्या बाबतीत हे खरं आहे. स्त्रिया मोबाइलपासून लांब राहू शकत नाहीत असं बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात चित्र उलट आहे. परदेशातल्या दोन विद्यापीठांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये, स्त्रियांच्या तुलनेत पुरूष जास्त वेळ मोबाइलपासून लांब राहू शकत नसल्याचं दिसून आलंय. या अभ्यासामध्ये मोबाइल वापरासंदर्भातल्या अनेक नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. जर्मनीतल्या व्रुझबर्ग आणि ब्रिटनमधल्या नॉटिंगहॅम विद्यापीठानं केलेल्या अभ्यासामध्ये, कोणतीही व्यक्ती सरासरी जेमतेम 44 सेकंद आपल्या मोबाइलपासून लांब राहू शकते. त्यातही पुरुष मंडळी मोबाइल वापरासाठी जास्त उतावळे असतात असं दिसून आलं आहे. पुरुष जास्तीत जास्त 21 सेकंद त्यांच्या स्मार्टफोनपासून लांब राहू शकतो. तर त्याच तुलनेत स्त्री मात्र 57 सेकंदापर्यंत आपल्या फोनचा विरह सहन करू शकते असं या अभ्यासातून दिसून आलं आहे.
 
अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष 1 स्मार्टफोनचा वापर जितका जास्त तितका मानसिक ताण जास्त. 2 स्मार्टफोनकडे असणारा आपला ओढा कल्पनेहून खूप अधिक आहे. 3 स्मार्टफोन वापरणं हे आता अनेकांसाठी अगदी सहज, नैसर्गिक झालं आहे. 4 एकटं असल्यावर अनेकांसाठी स्मार्टफोन हा पहिला पर्याय असतो. 5 स्मार्टफोनवरून होणार्‍या संवाद आणि अँक्टिव्हिटीचं जणू व्यसनच लोकांना लागलं आहे. 6 स्मार्टफोनवरील संवादामुळे डिजिटल आधार मिळाल्याची भावना तयार होते. 7 फोन जवळ नसल्यास इतरांपासून दुरावल्यासारखं वाटतं.