बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (15:09 IST)

पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

1 crore loan recovered in Pune; Filed a case against three illegal lenders पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी;  बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखलMaharashtra News Pune Marath News
व्यवसायासाठी वेळोवेळी २० ते २२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यावर तब्बल १ कोटी रुपयांची परतफेड केल्यानंतरही बायको मुलीला धंद्याला लावण्याची धमकी देण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी ( तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र देवेंद्र , राजेश राजेंद्र  आणि राजू ऊर्फ जॉन राजेंद्र देवेंद्र (रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल  झालेल्यांची नावे आहेत.
 
याप्रकरणी सोलापूर बाजार येथे राहणार्‍या ३९ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. राजेंद्र देवेंद्र यांच्याकडे सावकारी व्यवसायाचा कोणताही परवाना नाही. असे असताना त्यांनी व्यवसायासाठी २०१२ मध्ये फिर्यादी यांना दाम दुप्पट व्याजाने कर्ज दिले. वेळोवेळी त्यांनी २० ते २२ लाख रुपये दिले. त्याबदल्यात फिर्यादी यांनी व्याजापोटी आतापर्यंत १ कोटी रुपये दिले आहेत. असे असतानाही ते सातत्याने पैसे मागत होते. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करुन बायको मुलीला धंद्याला लावायची धमकी देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी गुन्हे शाखेकडे  तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.