सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (08:55 IST)

पुण्यातून 5 बांगलादेशी घुसखोरांना अटक

arrest
पुण्यातून महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर राहणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी -चिंचवड दहशतवाद विरोधी कक्षाने ताब्यात घेतलं आहे. हे आरोपी बांगलादेशी असून ते विना परवाना राहत होते. अशी फिर्याद पिंपरी-चिंचवड दहशतविरोधी सेलच्या हवालदाराने भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे.   
या आरोपींकडून बनावट आधारकार्ड, जन्म दाखल, शाळा सोडण्याचा दाखल जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात कारवाई करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शमीम नुरोल राणा(26),राज उर्फ ​​सम्राट सदन अधिकारी (27), जलील नुरू शेख उर्फ ​​जलील नूर मोहम्मद गोल्डर (38), वसीम अझीझ उल्हक मंडल उर्फ ​​वसीम अझीझुल हक हीरा (26) आणि आझाद शमशुल शेख उर्फ ​​मोहम्मद अबुल कलाम शमशुद्दीन फकीर अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. 
बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी चंचवड दहशतविरोधी सेलचे पोलीस हवालदाराने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे आरोपी भारतीय नागरिक असल्याचे सांगून नागरी अधिकाऱ्यांच्या विना लेखी परवानगी शिवाय हे सर्वजण शांतीनगर येथे राहत होते. तसेच हे एका कंपनीत कामाला होते. ही माहिती पिंपरी चिंचवड दहशतविरोधी सेल ला मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत या बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. 

Edited by - Priya Dixit