पुण्यातील गंभीर रुग्णांसाठी ८२ रुग्णवाहिका सज्ज

Last Modified मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:22 IST)
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेकदा एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी ८२ रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट ‘डायल १०८’ सेवेशी संपर्क साधताच रुग्णाला तत्काळ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कार्डिअॅक किंवा अद्ययावत रुग्णवाहिकेकरीता ‘डायल १०८’द्वारे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद म्हणाले, ‘करोनाचा एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याच्या नातेवाइकांनी तत्काळ १०८ वर संपर्क साधावा. त्यानंतर अॅम्बुलन्स रुग्णालय अथवा संबंधित केंद्रावर पोहोचेल आणि रुग्णाला इच्छितस्थळी नेईल.’
‘डायल १०८’ रुग्णवाहिकेच्या सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, ‘२४ रुग्णवाहिका अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट म्हणजेच अद्ययावत सोयीसुविधांसह सज्ज असतील. ५८ रुग्णवाहिकांत मूलभूत सोयी देण्यात आल्या आहेत. ‘कोव्हिड केअर सेंटर’वरून रुग्णाला घेऊन रुग्णाच्या नातेवाइकांच्या सूचनेनुसार खासगी अथवा सरकारी रुग्णालयात पोहोचविण्यात येईल.’

एखाद्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी अथवा हस्तांतर करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी चालकांच्या सुमारे १५३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका करोनारुग्णांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यात पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ११३ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ४० रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णवाहिका ‘डायल १०८’ला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी १०८ सेवेशी संपर्क साधावा. असही सांगण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी ...

पूर्ण जबाबदारी पोलिसांवर विश्वासाने टाकूया ते जे काही चौकशी करतील : सुप्रिया सुळे
“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यावर अनेक ट्विस्ट त्यात आले आहेत. ...

रत्नागिरीत मृत पक्षी आढळले, कोल्हापुरात महानगर पालिका ...

रत्नागिरीत मृत पक्षी आढळले,  कोल्हापुरात महानगर पालिका यंत्रणा सतर्क
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू
बीड जिल्ह्यातीलआंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. लोखंडी गावातील ...

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान
औरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही, चंद्रकांत पाटील यांचा सवाल
राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दावर राजीनामा द्यावा. ...