1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (17:40 IST)

6 दिवसाच्या बाळाला ताम्हणी घाटात फेकलं

A 6-day-old baby was dumped in Tamhani Ghat 6 दिवसाच्या बाळाला ताम्हणी घाटात फेकलं Marathi Pune News  In Webdunia Marathi
नात्याला काळिमा फासत केलेल्या कृत्याने जन्मलेल्या अवघ्या 6 दिवसाच्या बाळाला  ताम्हणी घाटात फेकण्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. चुलत बहिणीशी अनैतिक संबंध ठेऊन त्यापासून जन्मलेल्या 6 चिमुकल्याला फेकून देणाऱ्या चुलतभावाने  चिमुकल्या बाळाला ताम्हणी घाटात फेकून दिले. सचिन चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. 

पुण्याच्या घोटवडे भागात गोडांबेवाडीत राहणाऱ्या मंगल पवार असे या फिर्यादी  आईचे नाव आहे. या गोदंबेवाडी गावात मजुरी करतात. यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून त्यांना एक मुलगी आहे. जिथे त्या काम करतात त्याच ठिकाणी त्यांचा आरोपी चुलत भाऊ सचिन चव्हाण हा देखील काम करतो. 

या कामाच्या ठिकाणी त्या दोघांमध्ये जवळीक झाली आणि मंगल यांचे आपल्या चुलत भावाशी अनैतिक संबंध निर्माण झाले. त्या पासून त्यांना दिवस गेले आणि त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण आरोपी सचिन चव्हाण यांना त्यांचे नातेवाईक सतत दबाब टाकत होते. या मुळे आरोपी सचिन चव्हाण यांनी 5 फेब्रुवारी रोजी अवघ्या 6 दिवसाच्या लहानग्या बाळाला पुण्यातील ताम्हाणी घाटात दरीत फेकून दिले. या धक्कादायक प्रकारानंतर बाळाच्या आईने फिर्यादी मंगल पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेण्याचे काम सुरु केले. अद्याप बाळाचा काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांनी आरोपी सचिन चव्हाण याचा विरोधात विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहे.