मास्कविना फिरणा-यांवर 500 रुपये तर थुंकणा-यांकडून 1 हजार रुपये दंड
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. नागरिकांनी मास्क वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मास्कविना फिरणा-यांवर 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
शहरातील प्रत्येक नागरिकाने शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय, खासगी कार्यालयाच्या ठिकाणी संचार करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंगल कार्यालये, सांस्कृतीक सभागृह, सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येवू शकतील. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपहारगृहे अशा ठिकाणी संचार करताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.