1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (21:41 IST)

पुणे विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अभाविप विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार?

action will be taken against ABVP students
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये अश्लील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या गोष्टीचा निषेध करत या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, आता या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी धुडगूस घातला. तसेच या आंदोलक विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात सुरू असलेली कुलगुरुंची बैठक देखील उधळवून लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. पण यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे. “#रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडी च्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार? #SPPU” असे ट्वीट केले आहे. त्यामुळे या आंदोलक विद्यार्थ्यांवर काही कारवाई करण्यात येणार आहे की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor