बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (12:24 IST)

दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचलले टोकाचे पाऊल

After the death of two children
मुलांच्या मृत्यूमुळे नैराश्यात असलेल्या पित्याने पुणे शहरातील किरकिटवाडी परिसरात राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. संजीव दिगंबर कदम (वय 40 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  दोन मुलांच्या निधनानंतर पित्याने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा आणि दहा वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडले होते. तेव्हापासूनच वडिल नैराश्यात होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
तसेच पुण्यात दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. मोबाईल, पैसे विहिरीच्या काठावर ठेवून पित्याने लेकींसह जीवनयात्रा संपवली होती. पिता राजेंद्र भुजबळ यांनी दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ या दोघी मुलींसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं होतं.