मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (15:45 IST)

या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकाने बंद राहणार

अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकाने बंद राहणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याविषयीची घोषणा केली आहे. जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
 
गणेशोत्सवाचा प्रारंभ १० सप्टेंबर रोजी झाला आहे. प्रतिष्ठापना सोहळा तसेच विसर्जन सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना यंदा परवानगी नाही, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमावलीत नमूद केले आहे.