1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (08:38 IST)

पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रन प्रकरण, कारने एकाला दिली धडक

Maharashtra News
महाराष्ट्रातील पुणे येथे एका व्यक्तीला धडक दिली. दिवाळीच्या रात्री एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह फटाके फोडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने त्याला धडक दिली. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुण्यातून हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना दिवाळीच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. दिवाळीच्या दिवशी लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून फटाके फोडत असतांना एक भरधाव कार ने फटाके फोडत असलेल्या व्यक्तीला धडक दिली.   

या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यानंतर जखमीला तातडीने कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले असून तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.