1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (21:46 IST)

पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद

Petrol Dealers Association has decided to go on strike from November 1
पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट जगवण्यावर जाणवण्याची शक्यता आहे.  खरंतर येत्या 20 ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा संप 11 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलाय. 1 नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आलाय.
 
विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor