गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (10:37 IST)

विकेंडला पर्यटकांची पर्यटनस्थळी तुडुंब गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे,परंतु अद्याप कोरोना पूर्णपणे संपलेला नाही.आता कोरोनासाठीचे लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. लॉक डाऊन मुळे लोकांना कंटाळा आला असल्याने आता मात्र लोकं सर्व नियमांना धता देऊन सहली ला जात आहे.विकेंड च्या निमित्ताने पर्यटक चक्क पर्यटन स्थळी गर्दी करत आहे.लोणावळा,भुशी डॅम वर पर्यटकांची तुडुंब गर्दी दिसली.
 
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता पर्यटनस्थळी 144 कलम लागू केला आहे.या आठवड्यात पुणे आणि त्याच्या जवळच्या परिसरात कलम 144 लागू करण्याचे पुणे जिल्ह्यातील पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.त्यामुळे कलम 144 जमावबंदी च्या आदेशानुसार,पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये.तरी ही या आदेशाला धता देऊन पर्यटकांची गर्दी पर्यटनस्थळी उसळत आहे.पोलिसांनी पर्यटनस्थळी पोहोचून लोकांवर कारवाई केल्याचे वृत्त समजले आहे.
 
लोणावळात देखील कलम 144 लागू करण्यात आला असून लोकांनी जमावडा केल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केल्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच धबधब्याच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा,खंडाळा सारख्या पर्यटनस्थळी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.