1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (14:12 IST)

फोनवर बोलता बोलता तरुणाचा मृत्यू ,पुण्यातील घटना

Death of a young man while talking on the phone in pune
काळ कधी आणि कसे कोणावर झडप घालेल हे सांगता येणं कठीण आहे.  पुण्यात ओपन जिम मध्ये व्यायामानंतर फोनवर बोलताना 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील कोथरूड भागात उजव्या भुसारी कॉलोनीत सोमवारी ही घटना घडली. अमोल शंकर नकाते असे या मयत तरुणाचे नाव आहे.अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंटचा काम करत असून दररोज संयुक्त भुसारी कॉलोनीतील मित्रमंडळाच्या मैदानात व्यायाम करायला आपल्या मित्रांसोबत यायचा. काल रात्री देखील तो नेहमी प्रमाणे व्यायामाला गेला असताना त्याला फोन आला आणि फोनवर बोलताना तो अचानक खाली कोसळला. त्याला खाली कोसळलेला पाहून मित्रांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्याचे बोट विजेच्या प्रवाहामुळे काळीनिळी झाल्याचे सांगितले आहे. अमोलचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून अद्याप त्याचा मृत्यूचे कारण कळू शकले नाही.  
Edited By - Priya Dixit