1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (10:11 IST)

माणुसकीला काळिमा, दोन श्वानांना जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून जाळले

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन श्वानांना जाणीवपूर्वक पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे. ही घटना शहरातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. 10 ते 12 श्वानांसह पिलांचा विषबाधेमुळे संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी श्वान प्रेमी कुणाल यांनी पोलिसात धाव घेतली आहे. गंभीर बाब म्हणजे, मादीच्या सहा पिल्लांचा देखील मृत्यू झाल्याचा संशय प्राणिप्रेमींना आहे.
 
यात अधिक माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरतील शिवनेरी गल्लीमध्ये दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आलं असून इतर 12 भटक्या श्वानांचा विषबाधा होऊन संशयस्पद मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली. यात दोन श्नवानांना  पोत्यात टाकून जाळण्यात आलं आहे.