1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:59 IST)

गावी जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Gang rape by abducting a minor girl who was on her way to the village Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सात ते आठ जणांच्या टोळक्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.
 
या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, 31 ऑगस्टच्या रात्री पीडित तरुणी गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आली. यावेळी यातील काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता.संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक केली.या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.