गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (07:36 IST)

झेपत नसेल, तर गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

supriya sule
पुणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील काही शहरात दंगली होत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे झेपत नसेल, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली.
 
पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगर व अन्य शहरांमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, गृहमंत्र्यांची पकड नसल्याचेच यातून दिसत आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदाची जबाबदारी पेलत नसेल, तर फडणवीस यांनी या पदाचा राजीनामा देणे, हे केव्हाही योग्य ठरेल.
 
लोकप्रतिनिधींना वारंवार धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय? संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे धमकी दिली जात असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे संजय राऊत यांना तात्काळ झेड प्लस सेक्मयुरिटी द्यावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावे. राऊत देशातील वरिष्ठ नेते आहेत. खासदार आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, याकडेही सुळे यांनी लक्ष वेधले.