मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 20 मार्च 2022 (13:59 IST)

पुण्यात दारूच्या नशेत विद्युत वाहिनीच्या टॉवरवर तरुण चढला

आळंदी शहरालागत तालुका केळगाव हद्दीत दारूच्या नशेत एक तरुण उच्चदाबेच्या विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढून 12 तासापेक्षा अधिक वेळ टोकावर चढून बसला होता. सुदैवाने त्याला विजेचा शॉक लागला नाही. किशोर दगडोबा पैठणे(30) राहणार वाघोली असे या इसमाचे नाव आहे. हा तरुण चक्क शनिवारी दारूच्या नशेत शनिवारी केळगाव हद्दीतील उच्चदाबेच्या विजेच्या टॉवर वर चढून बसला. त्याला विजेच्या टॉवर वर चढलेलं पाहून काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्युत वीज महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळविले. त्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला टॉवरवरून खाली उतरण्यासाठी विनवणी करू लागले. तरी ही त्याने पोलिसांच्या म्हणणाल्या काहीच प्रतिसाद दिले नाही. त्याला खाली उतरवण्याचे सर्व प्रयत्न वाया गेले. त्याच्यासाठी पोलिसांनी संपूर्ण रात्र जागून काढली. 
 
आज सकाळी आळंदी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, रुग्णवाहिका बोलविण्यात आले. सर्वांच्या मदतीने अखेर त्यांच्या प्रयत्नानां यश आले. आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही. अखेर त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात आली आणि नंतर त्याला घरी पाठविण्यात आले.