मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2024 (21:44 IST)

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना मृत्यू

Kumar Maharashtra Kesari wrestler wrestler Vikram Shivajirao Parakhi dies while exercising
जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय 30) याचा जागेवरच मृत्यू झाला
 
कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब पटकावलेल्या पैलवानाच्या 
अचानक मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. पैलवान पारखी यांचे १२ दिसंबर रोजी लग्न होते.त्या पूर्वीच काळाने झड़प घातली.
 
मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. 28 नोव्हेंबर 2014 रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2014”  झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदकं व किताब मिळवले आहेत.
 
पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी यांचा निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय  स्तरावर कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतले होते.त्यानी अनेक पदक आणि किताब मिळवले होते. त्यांनी अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले होते. 

झारखंडच्या रांची मध्ये त्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  ब्रॉंझ पदक पटकावले होते. त्यांनी मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते.हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम याच्यामागे आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
Edited By - Priya Dixit