रविवार, 21 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (17:09 IST)

पुणे शहरात नवे 40 कंटेन्मेंट झोन

New 40
महापालिकेकडून शहरात 40 सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक कंटेन्मेंट झोन औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. शहरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. याठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याठिकाणी फलक आणि आवश्यकतेनुसार बॅरिकेटस लावण्यात येत आहे.
औंध-बाणेर 10
कोंढवा-येवलेवाडी 09
ढोले पाटील 06
कोथरुड बावधन 05
वानवडी 03
बिबवेवाडी 03
धनकवडी-सहकारनगर 03
सिंहगड रस्ता 01