गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:19 IST)

पुण्यात खाजगी क्लास सुरु होणार, आयुक्तांनी दिली परवानगी

पुणे शहरातील खासगी क्लास सुरु करण्याची परवानगी पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल ९ महिन्यांनंतर खासगी क्लासेस उघडणार आहेत. 
 
पुणे महापालिका प्रशासनाने  खासगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र शिक्षकांची कोरोना चाचणी, थर्मल गन, ऑक्सिमीटर, सोशल डिस्टन्सिंग हे बंधनकारक असणार आहे. 
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर खासगी क्लासेस देखील बंद होते. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना, दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते.