1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (15:16 IST)

क्वारंटाइन सेंटरमधून पळण्याच्या प्रयत्नात मुलगी खिडकीत अडकली

Pune Erandwane
पुण्यातील एरंडवण्यातील महिला सेवा मंडळाच्या क्वारंटाइन सेंटरमधून एका 18 वर्षीय मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून ती पळण्याच्या प्रयत्न करत होती पण ती अडकली. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मुलीची सुटका केली.
 
घाबरलेल्या मुलीला धीर देत हायड्रालिक कटरच्या साह्याने खिडकीचा गज तोडले गेले आणि सदर मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे राहणार्‍या एका 18 वर्षांच्या मुलीने महिला सेवा मंडळ क्वारंटाइन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गजामधील जागा कमी असल्यामुळे ती खिडकीत अडकली मग निघत येत नसल्यामुळे तिने आरडाओरड सुरु केली. रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या घटनेबद्दल माहित पडल्यावर कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही म्हणून अखेर अग्निशमन दलाला याबद्दल माहिती देण्यात आली.
 
सुटकेनंतर मुलीला महिला सेवा मंडळाच्या व्यवस्थापिकेच्या ताब्यात देण्यात आले.