1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (11:09 IST)

पुणे पोलिसांनी कारमधून जप्त केले पाच कोटी रुपये

Maharashtra News
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.   
 
तसेच एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, संध्याकाळी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील खेड-शिवपूर प्लाझाजवळ पोलीस नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी साताऱ्याकडे जाणारी एक कार थांबवण्यात आली. झडतीदरम्यान वाहनात बसलेल्या चौघांकडून 5कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कारमधील चालकासह चौघांची चौकशी करण्यात आली. ही रोकड पुढील तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik