मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (21:24 IST)

पुणे : डी.वाय.पाटील कॉलेजच्या प्राचार्यांना बजरंग दल कार्यकर्त्यांनी केली मारहाण : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Principal of DY Patil College
पुणे : येथील तळेगावमधील डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्याने महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
सविस्तर माहितीनुसार, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील स्त्रियांचं प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे का लावले आहे ? कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांन मारहाण केली आहे. या व्हीडीओत त्यांचे कपडे फाटल्याचे दिसत आहे.
 
 हा प्रकार थांबवून प्राचार्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहे. स्त्रियांच्या प्रसाधनगृहात  सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल अजून प्रलंबित असताना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेवरून हा वाद झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाने मात्र अद्याप काहीही भाष्य केले नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor