1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (23:31 IST)

पुण्यात आठवीपर्यंत शाळा बंद, उपमुख्यमंत्री म्हणाले- ऑनलाइन वर्ग सुरूच राहतील

Schools closed in Pune till 8th
कोरोना विरुद्धची लढाई सुरूच आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे शहर आणि पिपरी चिंचवडमधील शाळा बंद राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, मुलांचे वर्ग ऑनलाइन सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजित पवार म्हणाले की, पुण्यात मंगळवारी कोविड-19 संसर्गाचे 1,104 रुग्ण आढळले आहेत. येथे सकारात्मकता दर 18 टक्क्यांवर पोहोचला आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.