शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (08:09 IST)

सेक्स तंत्र’ शिबिर वादात..! या अजब प्रशिक्षणाला विरोध कायम

This is an advertisement for a training camp called 'Sex Tantra' Marathi Pune News In Webdunia Marathi
सध्या पुण्यात सोशल मीडियावरील एका अजब जाहिरातीमुळे नवा वाद उभा राहिला आहे . ‘सेक्स तंत्र’ या प्रशिक्षण शिबीराची ही जाहिरात आहे. हे प्रशिक्षण शिबीर १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचं जाहिरातीत म्हटलं आहे. नवरात्री उत्सवाच्या प्राश्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे या शिबिराचे शुल्क. शिबिरासाठी थोडेथिडके नाही तर प्रतिव्यक्ती तब्बल १५ हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलेय.

मात्र या जाहिरातीवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे या जाहिरातीला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे मात्र हा उपक्रम बेकायदेशीर आणि संशयास्पद असल्याचं मत व्यक्त होत आहे. तर सेक्स तंत्र या भानगडीला मनसे, तृप्ती देसाई आणि काही धार्मिक संघटनांकडून विरोध होत आहे.

“हे सेक्स तंत्र प्रशिक्षण राबवणारी जी टोळी आहे तुझ्या विरोधात कारवाई होणं गरजेचं आहे. यामुळे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळ्या जर सक्रिय होणार असतील. तर यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे.” – तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या
या शिबिरात अनेक अशा गोष्टी आहे ज्या वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतात. त्यापैकी एक आहे ओशो मेडीटेशन. या शिबिरात ओशो मेडीटेशनचा उल्लेख केला आहे. मात्र याचा ओशोशी काही संबंध नसून तरुणांची दिशा भूल करण्याचा हा प्रयत्न असल्याच आणि ओशोंनी अशा प्रकारच्या तंत्राचे प्रयोग केले नसल्याचे ओशोचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी म्हंटले आहे.
 
“सत्यम शिवम फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने जे शिबीर आयोजित केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर जाहिरात होत आहे. त्याचा मनसे आणि महिला सेना निषेध करत आहे. ऐन नवरात्रोत्सवात आयोजित केलेलं हे शिबिर महिला वर्गाचा अपमान आहे. मनसे आणि महिला सेनेच्या वतीने याबद्दल कडक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. हा प्रकार पुणेकर सहन करणार नाही यावर कारवाई झाली नाही. तर मनसे आणि महिलासेना तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे.” – वनिता वागस्कर, नवनिर्माण महिला सेना.
 
सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनने या शिबिराचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय शिबिरात तरुण- तरुणींचा सहभाग असणार आहे. हे शिबिर निवासी शिबिर आहे. ज्याची फी १५ हजार रुपये असेल. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान या शिबिराच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येत असताना आता आयोजकांवर कारवाई होणार का ?, हे शिबीर पुण्यात होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.