मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (09:00 IST)

चंद्रकांत पाटील यांचं भरपावसात भाषण

Speech by Chandrakant Patil Speech in abundance चंद्रकांत पाटील यांचं भरपावसात भाषणMaharashtra news Pune Marathi News
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भरपावसात भाषण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरपावसात केलेल्या भाषणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती.
त्यानंतर आता पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेला एक कार्यक्रमही चर्चेत आला आहे. कारण या कार्यक्रमात पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी न थांबता भिजत आपलं भाषण सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं.
पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान हे चित्र पाहायला मिळालं आहे. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस कोसळू लागला, मात्र पाटील यांनी न थांबता आपलं संबोधन सुरूच ठेवलं.