बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (16:55 IST)

पुण्यातील रिक्षाचालकांचा येत्या १ ऑक्टोबरला लाक्षणिक बंद

Symbolic shutdown
राज्य सरकार रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने पुण्यातील रिक्षाचालकांनी १ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक बंद पुकारला आहे. या संदर्भात नुकतीच रिक्षा पंचायतीची बैठक घेण्यात आली होती.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादेमुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे रिक्षा पंचायतीने यापूर्वी ३१ जुलै रोजी असंतोष प्रकट निदर्शने केली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा परिवहन प्राधिकरण अध्यक्ष नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन दिले होते. तरीही कोणतीच हालचाल झालेली नाही. या परिस्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मतचाचणी करून हा एक दिवस रिक्षा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.