1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (15:30 IST)

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी तारीख १३ जून पर्यंत वाढवली

The date
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी तारीख १३ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या २१५३ सदनिका व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या ७५५ सदनिका अशा एकूण २९०८ सदनिकांची अंतिम नोंदणी १३ मे पर्यंत होती.
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव या साठी अर्ज करण्याची तारीख १३ जून पर्यंत वाढ देण्यात आली आहे. 
 
आता अर्जदारांना १३ जून पर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरून अर्ज करता येईल.
 
म्हाडाच्या लॉटरीला एक महिन्याची मुदत वाढ मिळणे ही अर्जदारांसाठी सुवर्णसंधी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज करावे व आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे असे अहवान मुख्य अधिकारी  नितिन माने यांनी केलेले आहे.