गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (14:39 IST)

फी भरली नाही म्हणून शाळेत कोंडलं

पुण्यात एका धक्कादायक प्रकरणात शाळेची फी भरली नाही म्हणून 9 वर्षाच्या विद्यार्थ्याला खोलीत कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला आहे.
 
माहितीप्रमाणे 4 एप्रिल रोजी ही घटना घडली ज्यात इयत्ता 4 थीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला आहे. हा आरोप पालक रमेश शाहू यांनी केला आहे. पालक रमेश साहू यांनी शाळेविरोधात तक्रार केली असली तरी शाळाप्रशासाने आरोपांचे खंडन केले आहे.
 
कोठारी इंटरनॅशनल शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला कोंडल्यानंतर शाळेत या प्रकारे असंवेदनशील वागणूक कशी मिळू शकते, असा सवाल केला जात आहे. ही बातमी साममध्ये प्रकाशित झाली आहे.
 
माहितीप्रमाणे विद्यार्थी वर्गात जाताच कर्मचाऱ्यांनी त्याला खेळणी व पुस्तके असलेल्या दुसऱ्या खोलीत नेले आणि तेथे त्याला कुलूप लावून पाच तास कोंडून ठेवले. दरम्यान मुलाने दार वाजवून मदतीसाठी हाक मारली मात्र कोणीही मदतीला आलं नाही.
 
सामने दिलेल्या वृत्तानुसार मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाची फी भरायला उशिर झाल्याने त्याला वर्गात घेणार नाही, असा फोन आल्यानंतर ते शाळेत गेले. मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली.
 
दरम्यान, त्यांनी शाळा प्रशासनाशी चर्चा केल्यावर फी भरा किंवा शाळा सोडल्याचा दाखला घ्या असे सांगितलं गेले. मात्र शाळा प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.