शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (09:33 IST)

पुण्याची डबेवाली ‘टू-व्हीलर’वर पोहचविणार डबे

दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत पुण्याची डबेवाली ही संकल्पना करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागवार टू-व्हीलरवर या महिला डबे पोचविण्याचे काम करतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दोन केंद्र असणार आहेत. या केंद्रामार्फत सर्व विभागात ही सेवा पुरविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती दुर्गा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कामात फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचा देखील सहयोग असणार आहे.

दुर्गा भोर म्हणाल्या, महिला रोजगार निर्मितीसाठी लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्या कामगार वर्गाची तसेच अनेक कार्यालयांमध्ये रखवालदार तसेच आयटी पार्क, व्यावसायिक, कामगार, शाळा, विद्यार्थी वर्ग यांना स्वच्छ सकस अन्नपुरवठा करण्यासाठी आणि महिला रोजगार निर्मितीसाठी पुण्याची डबेवालीची निर्मिती करण्यात येत आहे.
 
शहरातील अनेक बचत गटांना कामे नाहीत. परंतु, प्रत्येक भागातील बचत गटाला काम निर्माण करून देण्यासाठी पुण्याची डबेवाली हा कन्सेप्ट दुर्गा ब्रिगेड संघटनेने आणलेला आहे. त्याद्वारे काही कंपन्यांचे ऍप्रोच झाले असून अनेक कंपन्यातील कामगार तसेच एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थी तसेच अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असल्याचेही त्यांनी सांगितले.