मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (21:29 IST)

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक

Two friends of drug mafia Lalit Patil arrested from Nashik : अमली पदार्थ तस्कर ‘मोस्ट वाँटेड’ ललित पाटील याला पकडण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके मागावर होती.अखेर मुंबई पोलिसांनी बंगळुरूत जाऊन ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित पाटील मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मात्र एकीकडे मुंबई पोलिसांचं कौतुक होत असतानाच पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले.
 
यानंतर आता पुणे पोलिसांच्या तपासाला वेग आला असून  ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे.  नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.
 
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर नाशिकला गेला. नाशिकला या दोन्ही मैत्रीणींना भेटला  त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. ललित पाटीलच्या घरी ठाकलेल्या छापेमारीत पोलिसांना तीन किलो सोने सापडले होते. ललित पाटीलकडे आणखी पाच किलो सोने असून हे सोने यांच्याकडे सापडण्याची शक्यता आहे.
 
फरार असताना या दोघींच्या सतत संपर्कात
ललित पाटील पुण्यातून पसार झाल्यानंतर  मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिला भेटायला नाशिकमध्ये आला. त्यानंतर अर्चना निकम या दुसऱ्या मैत्रीणीला देखील तो भेटला या दोघांकडून पैसे घेऊन तो पुढे पसार झालाय ललित पाटील मेफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही वाटा या दोघींवर खर्च करत  होता. ललित पाटील  दोन आठवडे फरार असताना या दोघींच्या सतत संपर्कात होता. या दोघींना नाशिकमधून अटक केल्यानंतर गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.