शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 1 जून 2025 (16:00 IST)

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर दोघांना भरधाव मिक्सरने उडवलं, मृत्यू

Two killed after being hit by speeding mixer
पुणे- मुंबई महामार्गावर ताजे गावाच्या हद्दीत शनिवारी पहाटे पिकअप वाहनाचा पंक्चर झालेल्या चाकाला दुरुस्त करण्यासाठी बाजूला थांबलेल्या दोन तरुणांना भरधाव येणाऱ्या मिक्सरने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अजय कन्हैयालाल यादव राहणारे मुंबई आणि अफजल मुर्तुजा खान असे या मृतांची नावे आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना राकेश कुमार नेत प्रसाद यादव यांनी कामशेत पोलिसांना दिली. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश कुमार  हे त्यांच्या पिकअप वाहनाने मुंबईच्या दिशेने जात असताना ताजे गावाच्या हद्दीत एक्सप्रेसवे वर त्यांच्या वाहनाचे चाक पंक्चर झाले त्यांनी वाहन रस्तेच्या कडेला उभारले.मयत अजय यादव आणि अफजल खान हे पंक्चर दुरुस्तीचे काम करत होते.
त्याचवेळी वेगाने येणारे मिक्सर त्यांच्या पिकअपला धडकले.या धडकेत अजय आणि अफजल मिक्सरच्या चाकाखाली आले आणि चिरडून त्यांचा मृत्यू झाला. तसेच अपघातात पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले. 
अपघातानंतर मिक्सरच्या चालक घटनास्थळावरुन पसार झाला.
या प्रकारणी मिक्सर चालकाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit