शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)

सेल्फी काढण्याच्या नादात दोघे वाहून गेले

पुण्यात बुधवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीला सोडलेले पाणी पाहण्यासाठी आलेले दोन तरुण सेल्फी काढताना बुडल्याची घटना वटेश्वर घाटावर घडली. यावेळी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दोघेही वाहत गेले. ओम तीमप्पा तुपधर (वय 18) आणि सौरभ सुरेश कांबळे (वय 20, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी पाण्यात बुडालेल्या दोघांची नावे असून दोघेही शिक्षण घेत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार आणि दोन मित्र बाबा भिडे पुलानजीक फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले.