गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (07:56 IST)

येत्या गुरूवारी संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा बंद राहणार

पुण्यातील वडगांव, चतुःश्रृंगी, वारजे जलकेंद्र परीसर येथील विद्युत आणि इतर देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरूवारी म्हणजेच 11 फेब्रुवारीला संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. याशिवाय येत्या शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व पुणेकरांनी याबाबत नोंद घ्यावी, असं आवाहन पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
 
वडगांव जलकेंद्र परिसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर ,धनकवडी, कात्रज , भारती विद्यापिठ परिसर, कोंढवा बु इत्यादी.चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर : पाषाण , औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.