शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (15:13 IST)

World Cup Trophy In Pune: वर्ल्डकपची ट्रॉफी आज पुण्यात फॅन्सला पाहता येणार

World cup trophy
World Cup Trophy In Pune:क्रिकेट चाहत्यांना आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी वर्ल्ड कपची ट्रॉफीची आज थाटामाटात मिरवणूक निघणार आहे. या ट्रॉफी बरोबर सेल्फी काढण्याची संधी देखील चाहत्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीचा पुण्यात काढलेला मी पहिला फोटो आहे. आज दुपारी हॉटेल जेडब्ल्यू मेरिएटपासून सेनापती बापट रोड – सिम्बॉयसिस कॉलेज – बीएमसीसी – फर्ग्युसन रस्ता ते कृषी महाविद्यालय या मार्गावरून मिरवणूक होणार. ट्रॉफीची मिरवणूक ओपन बस मध्ये होणार असून निळ्यारंगाची ही बस आहे.

बसचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. पुण्याच्या मैदानात ही ट्रॉफी प्रदर्शनसाठी ठेवली जाणार आहे . 
“तसंच कृषी महाविद्यालयात सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही ट्रॉफी ठेवण्यात येणार आहे
 
 Edited by - Priya Dixit