शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:15 IST)

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी यांची नावं निश्चित?

sachin ahir
शिवसेनेने विधान परिषदेसाठीही आतापासूनच तयारीला लागली आहे. शिवसेनेकडून  विधान परिषदेसाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहे. सचिन अहिर  आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे  समजते.
 
विधान परिषदेची निवडणूक 20 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. त्यामुळे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. दरम्यान, आमशा पाडवी हे नंदुरबार येथील शिवसेना नेते आहेत. तर सुभाष देसाई उद्योगमंत्री आहेत.