शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (14:24 IST)

रक्षाबंधन भाऊबीज यात काय फरक? जाणून घ्या 8 कारणे

रक्षाबंधनाच्या सणाची बहिणींना विशेष प्रतीक्षा असते. कारण त्या दिवशी त्यांच्या भावांकडून अनेक भेटवस्तू मिळतात आणि आशीर्वाद मिळतात. पण अनेकदा भाऊबीज याबद्दल लोक विचारात पडतात की त्या दिवशी काय होते? राखी आणि भाऊबजी यात काय फरक आहे? चला, आज ही माहिती मिळाल्यावर आपल्याला रक्षाबंधन आणि भाऊबीज मधील फरक समजेल. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते, तर भाऊबजी कार्तिक द्वितियेच्या दिवशी साजरी होते. भाऊबीज हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणातील शेवटचा दिवस असतो. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याशी संबंधित सण आहे.
 
1. रक्षा बंधन याला संस्कृतमध्ये रक्षा सूत्र बंधन असे म्हणतात जेव्हाकी भाऊबीज याला संस्कृतमध्ये भागिनी हस्ता भोजना असे म्हणतात. अर्थात रक्षाबंधनला रक्षा सूत्र बांधतात जेव्हाकी भाऊबीजेला बहिण आपल्या भावाला भोजनासाठी आमंत्रित करते.
 
2. रक्षाबंधनला बहिण आपल्या भावाच्या हातावर रक्षा सूत्र बांधते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. जेव्हाकी भाऊबीजच्या दिवशी बहिण भावाला घरी बोलावून भोजन करवून तिलक करते, त्याला ओवाळते, मिठाई खाऊ घालते.
 
3. रक्षाबंधन या सणाचा प्रारंभ इंद्र, राजा बली आणि श्रीकृष्ण यांच्यामुळे झाला होता तर भाऊबीज सण यमराजामुळे साजरा केला जातो म्हणून याला यम द्वितीया असेही म्हणतात.
 
4. रक्षाबंधनच्या दिवशी महाराजा बली यांची कथा ऐकली जाते जेव्हाकी भाऊबीजेला यम आणि यमुना यांची कथा ऐकण्याची परंपरा आहे.
 
5. रक्षाबंधनाला भावाला मिठाई खायला देण्याची प्रथा आहे, तर भाऊबीजच्या दिवशी जेवणानंतर भावाला पान खायला देण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की विडा खाऊ घातल्याने बहिणीला अखंड सौभाग्य लाभतं.
 
6. भाऊबीजेच्या दिवशी यमुनाजीमध्ये स्नान करणाऱ्या बंधू -भगिनींवर यमराज अत्याचार करत नाहीत. मृत्यूचा देव यमराज आणि त्याची बहीण यमुना यांची या दिवशी पूजा केली जाते, तर रक्षाबंधनाच्या दिवशी असे होत नाही.
 
7. भाऊबीज संपूर्ण भारतात साजरी केली जाते जेव्हाकी रक्षाबंधन काही फक्त काही प्रांतांमध्ये प्रचलित आहे कारण काही प्रांतांमध्ये श्रावण पौर्णिमा भाऊ आणि बहिणीला जोडून साजरी केली जात नाही.
 
8. कर्नाटक हे सौदरा बिदिगे नावाने प्रसिद्ध आहे तर बंगालमध्ये भाऊबीज सण भाई फोटा नावाने प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये भौ किंवा भै-बीज, महाराष्ट्रात भाऊबीज तर अनेक प्रातांमध्ये भाई दूज असे नावं आहेत. भारताच्या बाहेर नेपाळ मध्ये याला भाई टीका असे म्हणतात. मिथिलामध्ये याला यम द्वितीया या नावाने साजरा करण्याची पद्धत आहे.