मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

रक्षाबंधनावर या 5 वस्तू आरोग्यासाठी धोकादायक

रक्षाबंधन म्हणजे उत्साह, आनंद, मस्ती, भेट, नट्टा पट्टा करणे, खाणे, आणि माहेरी आपल्या कुटुंबासह मस्ती करणे. परंतू या सणात आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे, कारण या सणात आपण वापरत  असलेल्या या 5 वस्तू आरोग्यावर विपरित परिणाम टाकू शकतं- 
1 मिष्टान्न- आपल्याला अधिक मिष्टान्न खाल्ल्याचे दुष्परिणाम माहीतच असतील. परंतू सणासुदी बाजारात मिळणारे मिष्टान्न आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम टाकू शकतात. यात रंगापासून ते स्वाद पर्यंत सर्व बनावटी असतं. ज्या पदार्थांपासून मिष्टान्न तयार करण्यात येतं ते सर्व भेसळयुक्त असतं. म्हणूनच सणासुदी घरी तयार केलेलं गोडधोड खाणे उत्तम ठरेल.

2 खवा- घरी गोड करायचं म्हटले की खवा बाजारातून आणला तरी हे धोकादायक ठरू शकतं. कारण या दिवसात बनावटी खवा विकला जातो. हे तयार करण्यासाठी कास्टिक सोडा वापरण्यात येतो. जे आपल्या पचन तंत्र आणि आरोग्याला प्रभावित करतं.

3 भेसळयुक्त तूप- बाजारातून तूप आणून पदार्थ तयार करण्याचा विचार असेल तर तुपाची शुद्धता तपासून घ्या. कारण शुद्ध तूप विकण्याचा दावा करणारेही अनेक उत्पादक तूप तयार करण्यासाठी जनावरांची चरबी वापरतात. म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे.

4  मेटलची राखी- खरं तर राखी  म्हणजे रेशमाची दोरी असते, परंतू हल्ली फॅशन ट्रेंडप्रमाणे मेटॅलीक राखी बाजारात उपलब्ध असते. परंतू राखीमध्ये वापरण्यात येणारी धातू अधिक वेळ पर्यंत आपल्या त्वचेच्या संपर्कात राहिल्यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती असते. यापासून वाचण्यासाठी साधी दोरी किंवा मोत्यांची राखी उत्तम आहे.

5 नमकीन- घरात करण्याचा कंटाळा आणि जिभेला बाहेरच्या पदार्थांची चव म्हणून आपण नमकीन बाजारातून आणणार असाल तर काळजी घ्या. या नमकीनमुळे उलट्या- जुलाब सारखे रोग होऊ शकतात. सणासुदी हे क्रिस्पी बनविण्यासाठी यात काही डिटर्जेंट आणि इतर हानिकारक पदार्थ मिसळले जातात. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.