शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

भूपाळी रामाची

उठोनियां प्रात:काळीं । जपा रामनामावळी।।
स्वयें घ्यातो चंद्रमौळी। शैलबाळीसमवेत ।। घृ.।।

राम योग्यांचे मंडण। राम भक्तांचें भूषण।।
राम धर्माचें रक्षण। संरक्षण दासांचे ।।1।।

रामें ताटका मारिली । रामें शिळा उद्धरिली।
रामें जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ।।2।।

रामें पाषण तारिले । रामें दैत्य संहारिले।।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ।।3।।

रामें रक्षिलें भक्तांसी । रामें सोडविलें देवासी।।
राम दासाचे मानसीं । रामदासीं आनंद ।।4।।