testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आमदारांनी अंगिकारला लाल त्रिकोण

-महेश जोशी

aarogya
ND
कुटुंब नियोजन मोहिमेसाठी शासकीय स्तरावर होत असलल्या प्रयत्नांचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मान राखलेला दिसत आहे. विधानसभेतील २८८ आमदारांच्या कुटुंब विस्तारासंबंधी मोठी रोचक माहिती समोर आली असून सुमारे ८० टक्के आमदारांना तीनपेक्षा कमीच अपत्ये आहेत. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, उद्योगमंत्री अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील यांच्यासह तब्बल ३६ आमदार, मंत्र्यांनी मुलींवर 'फॅमिली' प्लॅनिंग' करुन आदर्श निर्माण केलाय.
देशभरात महागाई गगनाला भिडली आहे. जागतिक स्तरावर ही समस्या भेडसावत असली तरी अनियंत्रित लोकसंख्याही त्यास महत्त्वपूर्ण कारण सांगितले जात आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील १२ कोटी जनतेच्या हितासाठी विधानसभेत बसलेल्या आमदारांचा लोकसंख्या वाढीतील सहभाग जाणून घेतला असता, समाधानकारक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथील सर्वेक्षण करणारी विख्यात संस्था 'श्री पॉलिटीकल रिसर्च ब्यूरोचे' सुनील पुरुषोत्तम देशपांडे यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.
  इंदिरा गांधीच्या कार्यकाळात ''हम दो, हमारे दो'' ची घोषणा देण्यात आली होती. राज्यातील ९८ आमदारांनी जी आचरणात आणल्याचे दिसते. यात तीन महिला आमदारांचही समावेश आहे.      
याज्यातील ४२ आमदारांनी एका अपत्यावरच कुटुब विस्ताराला फुलस्टॉप दिला आहे. यामध्ये नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे पुलगावचे आमदार रणजित कांबळे, परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव, शिवसेनेचे बाळा नांदगावकर, भाजपचे निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, उमरखेडचे राष्ट्रवादी आमदार वशीद पटेल, बिलोलीचे काँग्रेस आमदार भास्कर पाटील, आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा, परांडाचे राष्ट्रवादी आमदार राहुल मोटे आदींचा समावेश आहे.
इंदिरा गांधीच्या कार्यकाळात ''हम दो, हमारे दो'' ची घोषणा देण्यात आली होती. राज्यातील ९८ आमदारांनी जी आचरणात आणल्याचे दिसते. यात तीन महिला आमदारांचही समावेश आहे. मराठवाड्यातील तर बहुतांश नेतेमंडळींनी दोनवर समाधान मानायचे ठरविलेले दिसून येते. अहमदपूरचे भाजप आमदार बाबूवान खंदारे, जालन्याचे आमदार अर्जून खोतकर, कळंबचे द्यानंद गायकवाड व उमरग्याचे रविंद्र गायकवाड, उद्योग मंत्री अशोक चव्हाण, तुळजापूरचे मधुकर चव्हाण यांनी दोन अपत्यावरच कुटुब विस्ताराचा ब्रेक दिला. त्यांच्यासोबत भोकरदनचे चंद्रकांत दानवे, आष्टीने सुरेश धस, बीडचे सुनील धांडे, गेवराईचे अमरसिंह पंडित, कलडचे नामदेव पवार, उदगीरचे चंद्रशेखर भोसले, राजेंद्र दर्डा, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांनी दोन मुलांचे पालन होणे पसंत केले आहे.
aarogya
ND
राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सहकारमंत्री पतंगराव कदम, अन्न पुरवठा मंत्री सुनील तरकटे, सहकार राज्यमंत्री जयप्रकाश मुंदडा, जलसंपदा मंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, शिक्षणमंत्री वसंत पुरके, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अशा मंत्री महोदयांचे स्थान दोन अपत्यांवर 'फुलस्टॉप ' लावणार्‍यामद्ये लागते. एकूणच विलासराव देशमुख मंत्रिमंडळ या आघाडीवर तरी समाधानकारक कामगिरी करणारे ठरले आहे.
तीन अपत्ये असणार्‍यांमध्ये सुमारे ८९ आमदारांचा समावेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांच्यासहित आहे. औरगाबादचे (पूर्व) डॉ. कल्याण काळे, कळमनुरीचे शिवसेना आमदार गजानन धुधे, किनवटचे राष्ट्रवादी आमदार प्रदीप जाधव, पाथरीचे बाबाजानी दर्रानी, बंधारचे अपक्ष प्रतापराव पाटील, गंगापूरचे अण्णासाहेब माने, औसाचे दिनकर माने, परतुरचे बबनराव लोणीकर, मुखेडचे सुजान साबणे, हदगावचे सुभाष वानखेडे यांचा 'तीन' अपत्यांच्या यादीत समावेश आहे. विरोधीपक्ष नेते रामदास कदम, जगानन किर्तीकर, एकनाथ खडसे, वामनराव चटप, सुरेशदादा जैन, बबनराव पाचपूते, संदीपान भुमरे, या आमदारांनी तीन मुलांवरच कुटुंब नियोजन करुन घेतले.
असे आहे आमदारांचे फॅमिली प्लॅनिं
फक्त एक अपत्यः ४२ आमदा
राजेश टोपे, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. विमल मुंदडा, दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, छगन भुजबळ, रणजित कांबळे आदी.
फक्त दोन अपत्येः ९८ आमदा
सचिन अहिर, विनय कोरे , बब्रुवान खंदाडे, अर्जून खोतकर, दयानंद गायकवाड, रविंद्र गायकवाड, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, राजेंद्र दर्डा, चंद्रकात दानवे, जयप्रकाश दांडेगावकर, सुरेश धस, गणेश नाईक, अमरसिंह पंडित, नामदेव पवार, पद्मसिंह पाटील, कृपाशंकर सिंह आदी.
तीन अपत्ये- ८९ आमदा
डॉ. कल्याण काळे, बाबाजानी दुर्रानी, अण्णासाहेब माने, बबनराव लोणीकर, सुभाष साबने, एकनाथ खडसे, संदीपान भुमरे आदी.
aadarsh
ND
आदर्श पालकत्व
देशात स्त्री भ्रुणहत्येचे प्रमाण वाढले असून मुलीचा जन्म अनेक कुटंबांना नकोच वाटतो. अशा परिस्थितीत ३६ आमदारांनी मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी तीन मुलींवर समाधान मानले. अशोक चव्हाण यांनाही दोन, परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यानां एक, उर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही एक मुलगी आहे. थोडक्यात ' वंशाचा दिवा' शोधण्याच्या भानगडीत न पडता मुलींवरच विश्वास दाखवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
दहा अपत्यांचे पिता
वेबदुनिया|
प्रत्येक बाबतीत अपवाद आढळतातच. तीन अपत्यांपर्यंत ठिक आहे. परंतु दहा मुलांना जन्म देणारे आमदारही विद्यमान विधानसभेत आहेत. अलिबाचे काँग्रेसचे मधुकर ठाकूर असे हे फारसे चर्चेत नसणारे आमदार. काँग्रेसचेच नवापूरचे आमदार सुरुपसिंह नाईक यांना आठ मुलं आहेत. बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचे भाजप आमदार केशव आंधळे व मालेगावचे काँग्रेस आमदार शेख रशीद हाजी हे सात मुलांचे पिता आहेत. सामाजिक न्याय मंत्री काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भोकरचे राष्ट्रवादी आमदार श्रीनिवास देसाई व जव्हारचे माकर्सवादी आमदार राजाराम ओझरे सहा अपत्यांचे पालक आहेत.तब्बल १४ आमदारांना पाच तर ३० आमदारंना चार अपत्ये आहेत.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात : आंबेडकर

national news
सोलापुरात आपली लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात आहे, असे ...

राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध

national news
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. मराठी, हिंदी ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...

'तो' व्हिडिओ बनावट : भाजप

national news
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला ...

मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आता हे पण कळणार

national news
व्हॉट्स अॅप आणखी दोन नवे फिचर घेऊन येत आहे. ‘Forwarding Info’आणि ‘Frequently Forwarded’हे ...