सावित्री नदीवरील पूल कोसळला, वाहून गेली 2 एसटी बस, 8-10 वाहने

Last Modified बुधवार, 3 ऑगस्ट 2016 (10:09 IST)
महाड- रायगड जिल्ह्यातील महाड टोलनाक्याजवळील राजेवाडी फाट्याजवळचा जुना ब्रिटीशकालीन सावित्री नदीवरचा पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन बसेससह १२ ते १५ वाहने नदीत कोसळल्याची शक्यता व्यक्त होतेय. या अपघातातील मनुष्याहानीबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. घटनास्थळ महाड शहरापासून ५ किमीच्या अंतरावर आहे.
सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल कोसळला असून हा अपघात मध्यरात्री साडे बाराच्या सुमाराला घडल्याचे सांगण्याच येत आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचेही वृत्त आहे.
परिसरात किर्र अंधार आणि पावसाची संततधार सुरू असल्याने अद्याप बचाव कार्यही सुरू होऊ शकेलेले नाही. मात्र पुलावरून कोसळलेल्या वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता बचावकार्यासाठी 'एनडीआरएफ'च्या टीमला पाचारण करण्यात आले असून पहाटे शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, खेडहून महाडकडे रवाना झालेल्या दोन बसेस अद्याप महाडला पोहोचल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावरून कोसळलेल्या दोन बसेस याच असाव्यात असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 या क्रमांकावर संपर्क साधावा.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ...

महाराष्ट्रात चित्रीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र
राज्यात अत्त्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याचे ...

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा

अन्य राज्यातून सुमारे ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करा
राज्यात सध्या १ हजार २५० मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० ...

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर
राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ जणांच्या मृत्यू नोंद ...

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या ...

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू

राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू
राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना १५ ...