शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (10:05 IST)

हळदीच्या कार्यक्रमात राडा ११ जणांवर गुन्हे तर चार अटक

जळगाव येथे एका विवाहाला गालबोट लागले आहे. लग्नाआधी होत असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या किरोकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल, घटना जळगावच्या कोळीपेठेत घडली. याप्रकरणी पोलिसात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना अटक केली आहे. कोळीपेठेतील राजू गोविंदा कोळी याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी जोरदार तयारी केली होती. त्यानिमित्ताने गल्लीतील मित्रमंडळी  बॅण्डच्या तालावर जोरदार नाचत होती. दरम्यान, त्याठिकाणी नाचणा-या सागर सुरेश सपकाळे याला किशोर अशोक सोनवणे या तरूणाचा चुकून धक्का लागला होता, मग काय यावरुन दोघांमध्ये जबर वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीपर्यंत गेले. या हाणामारीत दोन्ही बाजूने लाठ्या- काठ्या व चॉपरचा वापर झाला आहे. याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या राड्याची जोरदार शहरात चर्चा होती.