शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस

पुणे- राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
 
अकरावीत तीन विषयांत व दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत.
 
विद्यार्थी तीन व दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता.