शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2024 (09:44 IST)

नांदेड मध्ये 2 तरुणांचा विहिरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू

death
नांदेडच्या लोहा तालुक्यात बेटसांगवी गावात दोन तरुणांचा विहिरीत विजेचा धक्का लागून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलाय आहे. संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे ते या मयत तरुणांची नावे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे तरुण 9 जून रोजी शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत लागलेल्या मोटारीतून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले असून नंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर बेट सांगावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 
 
त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

Edited by - Priya Dixit